Vyasan Mukti Upay in Marathi

कोणते ही व्यसन 3 दिवसात 100% सुटेल | Vyasan Mukti Upay in Marathi

व्यसनातून बाहेर यायचे असले, तर मनुष्याला स्वतःला तशी इच्छा असणे आणि त्यासाठी मन, बुद्धीवर काम करण्याची तयारी असणे, या दोन गोष्टी नितांत आवश्यक असतात.

स्वतःच स्वीकारलेल्या बंधनातून सुटणे खूप अवघड असते. असे बंधन स्वीकारल्यानंतर, बंधनात राहन स्वातंत्र्य कसे उपभोगायचे. हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. म्हणून व्यसनातून सुटणे अवघड असते.

व्यसन म्हणजे इंद्रियांच्या पूर्ण ताब्यात जाणे. विषयाकडे ओढल्या जाणाऱ्या इंद्रियांना विषयापासून परावृत्त करणे, हेच मुळात अवघड असते. मनुष्य इंद्रियांच्या जाळ्यात सापडून पलीकडे असलेल्या विषयाच्या ताब्यात जाणे म्हणजे व्यसन. एखादी सुंदर वस्तू दिसल्यास ती आपल्याकडे हवी ही सामान्य इच्छा; पण सर्व सुंदर वस्तू आपण जमा कराव्यात व त्या फक्त आपल्याला मिळाव्यात, हे व्यसन. वस्तू आपल्याकडे आणण्यात इच्छा असते; परंतु अमली पदार्थ किंवा दारू या विषयाकडे मन आकर्षित झाल्यानंतर बाह्यतः दिसते असे की दारूला आपण आपल्या पोटात घेतो आहे; पण खरे तर दारू त्या माणसाला संपूर्णतः आपल्यात समाविष्ट करते. असे झाले, की दारूचे गुण त्या माणसात दिसायला लागतात. सर्वच अमली पदार्थांचे किंवा धूम्रपानादी विषयांचे या पद्धतीने माणसाला स्वतःत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असतो व त्यालाच व्यसन म्हणतात.

स्वतःचे मूळ आसन जिवाने सोडले आणि भोगाचे विषयात

असलेले आसन धरले, की त्याला व्यसन असे म्हटले जाते.

सध्या लहान मुले, तरुण वर्ग, मोठी माणसे ही सगळीच इंटरनेटच्या माध्यमातून अनेक विषयांशी परिचित होतात. पण विश्व एवढे मोठे व अफाट आहे की इंटरनेटचे व्यसन लागून मनुष्य त्यात ओढला जातो. एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे

अनेक रोग, डोळ्यांचे त्रास होतात.

Vyasan Mukti Upay in Marathi

व्यसन मनुष्याला मत्त, उन्मत्त बनवते. म्हणजे स्वतःचे भान, स्वतःच्या मर्यादा विसरून व्यसनाधीन मनुष्य स्वतःच्याच धुंदीत राहतो. सगळ्याच व्यसनांत मनावर नियंत्रण’ हा पहिला आणि अत्यंत आवश्यक असा उपचार समजायला हवा. आयुर्वेदाने या अवस्थेला नाव दिले आहे ‘मद’.

व्यसन म्हणजे अशी सवय, जी मनुष्याला परावलंबी करून टाकते, असे म्हणता येईल. जेव्हा एखाद्या गोष्टीवाचून चालत नाही, तिच्या हव्यासापोटी काय चांगले, काय वाईट याचे भान राहत नाही. तेव्हा त्याला व्यसन म्हटले जाते.

मद्यपान, धूम्रपान, अफू-भांग-गांजा वगैरेंचे सेवन, ड्रग्ज, सट्टेबाजी, जुगार, वेश्यागमन, हस्तमैथुन वगैरे अनेक प्रकारची व्यसने सध्या मोठ्या प्रमाणावर दिसतात.

नावाप्रमाणेच मद्यामुळे होणारा मद हा, तर बाकी गांजा, अफू, हेरॉइनसारखे इतर ड्रग्ज यांना ‘विषज मदा’त अंतर्भूत करता येईल. मद्यज मदात मनुष्य चित्रविचित्र अंगविक्षेप करतो, वेडेवाकडे हावभाव करतो, त्याचा स्वतःवरील ताबा सुटतो व आवाज बिघडतो. विषज मदात अतिप्रमाणात झोप येते, मनुष्य स्वतःच्याच तंद्रीत राहतो, सर्वांग थरथरते आणि हा मद सर्वांत तीव्र असतो. यात वातदोष आणि पित्तदोष दोघांचेही मोठ्या प्रमाणावर असंतुलन होत असते. .

मद्य (व इतर व्यसन द्रव्ये) शरीरात गेल्याबरोबर हृदयावर आपला प्रभाव टाकतात, क्षोभ उत्पन्न करून मनामध्ये विकृती निर्माण करतात.

ओज, हृदय, मन या गोष्टी बिघडल्या, की त्याचा परिणाम आपोआपच बुद्धी, इंद्रिये, आत्म्यावर होतो आणि मनुष्याचा स्वतःवरचा ताबा सुटतो. पुढे तो या सर्व द्रव्यांच्या अधीन होतो, व्यसनाधीन बनतो.

मिद्याप्रमाणे इतर सर्व नशा करणारी द्रव्ये मद्यापेक्षा कैक पटींनी तीव्र असल्याने मनुष्याला ताबडतोब व्यसनाधीन बनवतात व त्यांचे दुष्परिणामही अति भयानक असतात, त्यांच्यातून बाहेर पडणे अतिशय अवघड असते. त्यामुळे या शत्रूंपासून सुरवातीपासूनच दूर राहणे चांगले.

भाग, अफू, गांजा, हेरॉइन, ब्राऊन शुगर, कोकेनसारखी ड्रग्ज

बोंडावाटे, धूम्रपानाकरवी, चिलीमवाटे हुंगून, इंजेक्शन वगैरे विविध मागांनी पारीयात घेतली जातात. हळूहळू सगळ्या धातूंची झीज होते. ओज कमी कमी होत जाते आणि शरीराची सर्व प्रभा, तेजस्विता, प्रतिकारक्ती, जीवनशक्ती खंगत जाते.

‘धूमपान’ आणि ‘धूम्रपान’ यात फरक आहे. बिडी, सिगारेटकरवी केल्या जाणाऱ्या धूम्रपानाचा सगळ्यात मोठा धक्का बसतो तो फुप्फुसांना, पर्यायाने संपूर्ण श्वसनसंस्थेचे कार्य बिघडते. हलके हलके श्वास घ्यायला-सोडायला त्रास होणे, कोरडा खोकला, ठसका लागणे, छातीत दुखणे, दमा यांसारखे त्रास व्हायला लागतात. फुप्फुसांच्या कर्करोगासारख्या दुष्कर व्याधीही होऊ शकतात. सर्व शरीराला चैतन्य प्रदान करणाऱ्या प्राण-उदानाच्या कार्यातच

अडथळा येत असल्याने, संपूर्ण शरीरावर याचे दुष्परिणाम होतात. अतिरिक्त धूम्रपानामुळे वात-पित्त-दोषांचा प्रकोप, कफदोषाचा अतिप्रमाणात हास, रक्तधातू दुष्टी, इंद्रियांची ताकद कमी होणे, नजर, श्रवणशक्ती कमी होणे, चक्कर येणे, घशाला शोष पडणे, कानात आवाज येणे, अशक्तता वाटणे वगैरे विविध समस्या निर्माण होताना दिसतात.

चुनामिश्रित तंबाखू बराच वेळ तोंडात धरून ठेवल्याने तोंडात व जिभेला व्रण होऊ शकतात व त्यातूनच पुढे कॅन्सरचीही लागण होऊ शकते.

सगळ्याच व्यसनांत ‘मनावर नियंत्रण’ हा पहिला आणि अत्यंत आवश्यक असा उपचार समजायला हवा.

त्यासाठी सुरवात करता येते शरीरशुद्धीपासून. शुद्ध सात्त्विक मन, बुद्धी शुद्ध घरात अर्थात शुद्ध शरीरातच राहू शकतात. त्यासाठी आयुर्वेदिक तत्त्वांप्रमाणे प्रकृती, वय, शरीरशक्ती अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन विरेचन, वमन, बस्ती, नस्य असे पंचकर्मोपचार करून घ्यावेत. त्याला सात्त्विक आहार, शुद्ध हवा, सत्संग, चांगल्या व्यक्तींचा सहवास यांची जोड द्यावी. मनाची, बुद्धीची ताकद वाढेल असे आयुर्वेदातील औषधी प्रयोग, उपचार

शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. यालाच ध्यान, योगासने, योगनिद्रा, ॐकार गुंजन, प्राणायामादी योगक्रियांची जोड दिल्यास व्यसनरूप शत्रूवर कायमस्वरूपी विजय मिळवणे शक्य होईल.

सर्वात आधी सकारात्मक बनण्याची गरज आहे.

डॉक्टरांशी मनमोकळे पणाने बोलणे.

मनात येणाऱ्या प्रश्नांची डॉक्टरांशी बोलून समस्यांचे निराकरण करणे.

पुस्तकांचे वाचन व लेखनांचा संपर्कात राहणे व स्वतःला व्यस्त ठेवावे.

आपल्या मधील कला, आवड, छंद या गोष्टींचे जतन करावे.

आपल्याला ज्या व्यक्ती बादल प्रेम, विश्वास, आवड असेल त्या व्यक्ती बरोबर आपले मन मोकळे करावे व त्या व्यक्तींचा संपर्कात राहावे.

तुम्ही व्यसन सोडण्या साठी डॉक्टरांचा आणि व्यसनमुक्ती केंद्रांचा सला घेऊ शकता.

कुठल्या ही दुसऱ्या कामात गुंतवून घेणे.

घरगुती उपाय

नागिनींची पाने (विड्याची पाने) त्या मध्ये थोडासा भाजलेला ओवा घालून खाल्याने तंबाखू खाण्याची सवय सुटते.

आहारात हिरव्या पल्या भाज्या, फळे, ड्राय फ्रुईट्स, मोडलेले धान्य या पदार्थांचा योगुण प्रमाणात समावेश करणे.

सुपारी,ओवा, लवंग, गुल, मध, साखर, चोकॉलते यांचा वापर करावा.

भरपूर पाणी प्यावे, रोज कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

सकाळी नियमित चालावे आणि रात्री जेवणा नंतर चालावे, मधून मधून कामतबद्दल देखील करावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.