Aappe Recipe: सकाळच्या नाश्तात बनवा झटपट स्पेशल साउथ इंडियन डिश

दिड वाटी रवा, दिड वाटी दही, दिड वाटी हिरवा वटाणा, दिड वाटी फ्लॉवर, अप्पे बनवण्यासाठी हे पदार्थ (Food) लागतात. तसेच अर्धा चमचा मोहरी,

साहित्य

अर्धा चमचा आलं पेस्ट, तीन हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी थोडा कडीपत्ता, अर्धा चमचा बेकींग सोडा, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ हे साहित्य लागते.

अप्पे बनवण्यासाठी प्रथम फ्लॉवर, हिरवी मिरची आणि आलं कापून मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे. आता एका बाऊलमध्ये रवा घ्या. त्यात दही घालून हे मिश्रण चांगले मिक्स करुन घ्यावे. 

अप्पे बनवण्याची कृती

त्यानंतर यामध्ये फ्लॉवर,आलं आणि मिरचीचे जे मिश्रण तुम्ही बनवला आहे ते मिक्स करावे. काळजी घ्या की हे सर्व मिश्रण जास्त घट्ट होणार नाही. त्यात वेळोवेळी पाणी घालून पातंळ करत रहावे. 

हे मिश्रण थोडावेळ तसेच ठेवा. त्यामुळे रवा छान फुगेल. आता गॅसवर कढई ठेऊन त्यात तेल गरम करावे. त्या गरम तेलात मोहरी, कडीपत्ता टाकून तुम्ही बनवलेल्या सर्व मिश्रणाला फोडणी द्या. 

आता अप्पे बनवण्याच्या भांड्याला तेल लावा. मग त्यामध्ये थोडे थोडे मिश्रण भरावे. आता मिडियम गॅसवर अप्पे शिजवा, एका बाजूने गोल्डन ब्राउन रंग आल्यावर अप्पे दुसऱ्या बाजुने पलटा.  

दोन्ही बाजुने छान ब्राउन रंग आल्यावर गॅस बंद करा. तुमची केरळ स्पेशल रेसिपी (Recipe) र्सव्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही टोमॅटो सॉस, खोबऱ्याची चटणी यासोबत अप्पे खाऊ शकता.