आमिर खानच्या लेकीनं गुपचूप उरकला साखरपुडा, पहा कसा 

मागच्या काही महिन्यांपासून सातत्यानं चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या लेकीच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडचीही चर्चा रंगली होती. अशातच आता आमिर खानची लेक आयरा खानहिन बॉयफ्रेंड

बरोबर गपचूप साखरपुडा उरकला आहे. काही महिन्यांआधीच नूपुरनं आयराला प्रपोज केलं होतं.दोघांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आयराच्या साखरपुड्यातील दोघांचे आणि आमिरचे फोटो समोर आलेत. आयरा ही आमिरची पहिला पत्नी रीना दत्ता हिची मुलगी आहे. रीनानं देखील लेकीच्या साखरपुड्याला स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती 

लेक आयराच्या साखरपुड्यात आमिर खान खूप खुश होता. आयरानं लाल कलरचा सुंदर गाऊन तर नुपूरनं ब्लॅक कलरचा टक्सीडो कॅरी केला होता. तर आमिर देखील लेकीच्या महत्त्वाच्या क्षणी सफेद पायजामा आणि कुर्तीमध्ये स्पॉट झाला. 

आयराच्या साखरपुड्याला खान आणि शिखरे कुटुंबियांनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे आयराचा मोठा भाऊ जुनैद खान, किरण राव आणि छोटा भाऊ आजाद खान देखील साखरपुड्याला आले होते. 

दोघांनी काही आठवड्यांआधीच साखरपुड्याची डेट फिक्स केली होती. ते म्हणाले, आयरा आणि नुपूर एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत. दोघांचं नातं साध आणि खरं आहे. 

दोघांनी जवळच्या माणसांबरोबर साखरपुडा केला. आयारा आणि नुपूर 2020पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुपूर हा प्रसिद्ध जीम ट्रेनर असून तो आयराचाही जीम ट्रेनर होता. तसंच तो आमिर खानचाही जीम ट्रेनर असल्याचं सांगितलं जातं. 

लॉकडाऊनच्या काळात नुपूर आणि आयरा यांच्यातील जवळीक वाढली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी आयरानं दोघांचे फोटो शेअर ऑफिशिअली नात्याची घोषणा केली. 

त्यानंतर सप्टेंबर महिन्यात नुपूरनं एका स्पर्धेनंतर आयराला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.