बाल आधार कार्डबाबत मोठी अपडेट, आता हे काम करणे अत्यावश्यक

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नुकतीच बालकांच्या आधार कार्डविषयी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बालआधार कार्डात(Baal Aadhaar Card) काही माहिती अद्ययावत करणे त्यामुळे अनिवार्य करण्यात आले आहे. 

5-15 वर्षातील मुलांचे बायोमॅट्रिक तपशील अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ट्विट करुन प्राधिकरणाने यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. 

विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. ही माहिती अद्ययावत करण्यासाठी प्राधिकरणाने कोणतेही शुल्क ठेवले नाही. निःशुल्कपणे पालकांना बायोमॅट्रिक माहिती अपडेट करता येणार आहे. 

ही माहिती अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कुठलाही बदल होणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. बालकांचे बायोमॅट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर पालकांना जावे लागेल. 

बाल आधार कार्डासाठी ऑनलाईन प्रक्रिया करता येते. प्राधिकरणाच्या अधिकृत uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला नोंदणीचा पर्याय उपलब्ध होतो. नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यावर पालकांना बालकाचे नाव, पालकाचे नाव,

मोबाईल क्रमांक आणि इतर बायोमॅट्रिक माहिती जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर घराचा पत्ता, राज्य आणि इतर माहिती तपशीलवार भरणे अनिवार्य करण्यात आले आहे

तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला अपाईंटमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.