थंडीच्या दिवसात खजूर लाडूची ही स्पेशल रेसिपी नक्की ट्राय करा!
२५ खजूर बिया काढून, अर्धी वाटी बदाम भरडसर वाटून, १/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून, १ चमचे तूप, १ चमचे खसखस, वेलदोड्याची पूड
साहित्य
साहित्य
सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात खसखस घालून काही सेकंद परतावेत.
कृती
कृती
त्यात वाटलेले बदाम, खोबरं आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे. नीट मिक्स झाले, की गॅस बंद करून कोमटसर असताना लाडू वळावेत.
वळताना हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावाव. अशाप्रकारे खजूराचे लाडू तयार होतात.