देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज करा हे 3 उपाय, होईल फायदा

देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याला जीवनात क्वचितच अडचणींचा सामना करावा लागतो. 

दुसरीकडे, देवी लक्ष्मी जर कोपली तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक रोज काहीतरी उपाय करत असतात.

शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा रोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. पुढील तीन सोप्या उपायांनी तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता

1. घराची नियमित साफसफाई करणे- असे मानले जाते की जेव्हा घर स्वच्छ राहते तेव्हाच देवी लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे घराची नियमित स्वच्छता करावी. संध्याकाळीही झाडू लावू नये. घर नेहमी फक्त दिवसा स्वच्छ करा. 

2. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक बनवा- धार्मिक मान्यतेनुसार दररोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक बनवल्याने लक्ष्मीचे आगमन होते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा मुख्य मार्ग आहे.  

3. देवी लक्ष्मीची आरती- दररोज देवी लक्ष्मीची आरती करा. ज्योतिषांच्या मते, देवी लक्ष्मीची पूजा-अर्चा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. हा उपाय केल्याने धनवृष्टीचा योग तयार होतो.