मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गुवाहटी दौऱ्याची तारीख ठरली, 21 नोव्हेंबरला कामाख्या देवीचं घेणार दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 

21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. गुवाहटीला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. 

कामाख्या देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतरणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली त्याच प्रकारची ही खास पूजा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय हा दौरा आहे. गुवाहटीच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.  

सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. 

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. 

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांनी इच्छित फळ देतो असं मानलं जातं. त्यावेळी संजय राऊत यांनी कामाख्या देवीच्या दर्शनावरून टीका देखील केली होती.