मस्तच! England मध्ये वाजणार भारताचा डंका, मुकेश अंबानी विकत घेणार लिव्हरपूल क्लब

उद्योगपती मुकेश अंबानी आता एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहेत. अंबानी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 

रिलायन्स आता मुंबई इंडियनंतर आता क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवत आहेत. अंबानी लवकरच फुटबॉल क्लब लिव्हरपूल विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

एका अहवालानुसार, जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लब लिव्हरपूलसाठीचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. तो क्लब आता दुसऱ्याच्या हाती जावू शकतो. 

मुकेश अंबानी यांनी लिव्हरपूल क्लब बाबत पडताळणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.काही वर्षापूर्वी त्यांनी तो क्लब भागीदारीत खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

फुटबॉल क्लब लिव्हरपूलचे सध्याचे मालक फेनवे स्पोर्ट्स ग्रुप विकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. क्लबसाठी ४ अब्ज पौंड (सुमारे 381 अब्ज रुपये) किंमत निश्चित केली आहे. 

ते विकत घेण्याच्या शर्यतीत अंबानींसह अनेकजण असल्याचे बोलले जात आहे. जर मुकेश अंबानींनी हा करार पूर्ण केला तर भारताचा डंका इंग्लंडमध्ये वाजणार आहे. 

मुकेश अंबानी हे मोठे क्रीडाप्रेमी असल्याचे सांगितले जाते आणि ते क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीच आयपीएलचा मुंबई इंडियन्स संघ रिलायन्स ग्रुपचा आहे.  

याशिवाय त्यांनी इंडियन सुपर लीगसह भारतात फुटबॉलचा प्रसार करण्यातही मदत केली आहे. भारतातील खेळांमध्ये क्रिकेट हा भलेही अव्वल असेल, 

पण लिव्हरपूलसारख्या मोठ्या क्लबची मालकी भारतीयांच्या हाती आली, तर भारतात फुटबॉलचा प्रसार अधिक वेगाने होईल.