मुकेश अंबानींच्या नातवांची नावे ठरली, जाणून घ्या नावाचा अर्थ अन् शुभांक

जगभरातील दिग्गज आणि देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. रविवारी ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. विशेष बाब म्हणजे मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा ठेवण्यात आले आहे. 

आता, या नावांचा अर्थ आणि त्यांचा शुभांक याचीही चर्चा होत आहे. आदिया आणि कृष्णा, अशी दोन्ही जुळ्या मुलांची नावं ठेवण्यात आलं आहे. आदिया नावाचा अर्थ - सुरुवात किंवा पहिली शक्ती. आदियाचा मूळ अंक ५ आहे,  

अंकज्योतिष ५ नुसार आदियाचा अर्थ प्रगती, उन्नती, प्रिय असा होतो. ही मुले मजबूत, दूरदृष्टीचा, धाडसी, खर्चीक, स्वातंत्र्यप्रेमी, बेचैन आणि अध्यात्मिक असतात. कृष्णा नावाचा अर्थ - या नावाचा अर्थ "प्रेम, शांति आणि स्नेह" होय. कृष्णा चा मूळ अंक ८ आहे. 

अंकज्योतिष ८ अनुसार कृष्णाचा अर्थ प्रेमी, शक्ती प्राप्त करणारा, भौतिकवाद, आत्मनिर्भर आणि लक्ष्य प्राप्त करणारा, असा आहे. २०१८ मध्ये झालं होतं ईशा आणि आनंद यांच लग्न ईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते.