जपानी कंपनी होंडा युरोपियन बाजारपेठेनंतर ही स्कूटर भारतातही लॉन्च करू शकते.
कंपनी पुढील दोन वर्षांत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय आकर्षक डिझाइनसह आली आहे.
होंडानं प्रॅक्टिकल विचार ठेवून भविष्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल अशा डिझाइनची निवड केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर शहरातील छोट्या राइड्ससाठी डिझाइन केलेली आहे
स्कूटरला मोठा लगेज रॅक मिळतो आणि तिला 10-इंचाचे मागील चाक मिळते.
तसेच 12-इंच फ्रंट व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतात. लाइटिंग ऑल-एलईडी आहे आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोल एलसीडी आहे.
स्कूटरमध्ये काढता येणारी बॅटरी उपलब्ध आहे. कंपनी याला मोबाईल पॉवर पॅक (MPP) म्हणत आहे. MPP ही स्वाइपेबल बॅटरी आहे, जी घरच्या घरी चार्ज करण्यासाठी स्कूटरमधून काढली जाऊ शकते.
एका चार्जवर ती 40 किमी पेक्षा जास्त धावू शकते असा दावा कंपनीने केला आहे. त्याचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास निश्चित करण्यात आला आहे.