स्टेप 1 - वडा पाव, बाजारासारखा स्वादिष्ट मसाला बनवण्यासाठी प्रथम पाव मधोमध कापून घ्या. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये बटर टाकून गरम करा आणि मग पाव चांगला बेक करा.
मसाला वडा पाव रेसिपी
मसाला वडा पाव रेसिपी
स्टेप 2 - एका पॅनमध्ये तेल किंवा बटर गरम करा, त्यात चिरलेला कांदा घाला आणि हलका तपकिरी होईपर्यंत तळा. नंतर हिरवी सिमला मिरची टाका आणि कढई झाकून शिजू द्या.
सिमला मिरची थोडी मऊ झाल्यावर टोमॅटो एकत्र शिजवून घ्या. भाजी चांगली शिजल्यावर त्यात धनेपूड, जिरेपूड व हळद व मीठ घालून तळून घ्या. आता कढईत पाणी टाकून झाकण ठेवून शिजवा.
स्टेप 3 - जेव्हा सर्व भाज्या आणि मसाले चांगले शिजायला लागतात, तेव्हा पावभाजी मसाला घालून मिक्स करावे. नंतर उकडलेले बटाटे आणि हलके पाणी घालून शिजवा. कढईतील पाणी सुकल्यावर त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला.
स्टेप 4- भाजी तयार झाल्यावर भाजलेल्या पावात भाजी चांगली पसरवा. मधोमध भाजलेले शेंगदाणे, शेव भुजिया घालून सजवा. तुमचा वडा पावसारखा चविष्ट स्ट्रीट फूड तयार आहे.