थंडीसाठी डिंकाचे लाडू करायचा बेत आहे? घ्या सोपी रेसिपी, लाडू होतील झकास

1. डिंक - पाव किलो २. सुके खोबरे - पाव कीलो ३. खारीक पूड - पाव किलो ४. बदाम - १ वाटी

साहित्य

५. खसखस - अर्धी वाटी ६. गूळ - अर्धा किलो ७. काजू - १ वाटी ८. पिस्ते - अर्धी वाटी ९. साजूक तूप - १ वाटी

कढईत तूप घालून त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा. तळलेला डींक थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचा.

कृती

उरलेल्या तूपामध्ये बदाम, काजू, पिस्ते तळून घ्यायचे.  खोबरे किसून त्यामध्ये खसखस आणि खारीक पूड घालायची. बदाम, काजू आणि पिस्ते यांची मिक्सरवर बारीक पूड करुन घ्यायची. 

आता डिंकाची पूड, सुकामेवा पूड आणि खोबरे, खसखस व खारीक सगळे एकत्र करुन घ्यायचे. यामध्ये गूळ किसून किंवा बारीक पूड करुन घालायचा आणि तूप घालून सगळे मिश्रण हाताने एकत्र करुन लाडू वळायचे.