Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

1) सात ते आठ ओले कांदे 2) लसूण पाकळ्या 3) तेल 4) दोन ते तीन चमचे चिंच 5) कोथिंबीर

साहित्य

6) मीठ 7) एक चमचा बडीशेप 8) एक चमचा जीरे 9) लाल मिरची 10) मेथी दाणे 11) एक चमचा उडीद डाळ

कांद्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम कांदा सोलून नीट धुवून घ्या. यानंतर कांद्याचे पातळ काप करून बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये एक चतुर्थांश कप तेल टाका

कृती:

आणि त्यात लसूण पाकळ्या काही सेकंद शिजवा. आता त्यात चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर शिजवा. कांदा जास्त लाल होणार नाही याची काळजी घ्यावी. 

आता त्यात चिंच घाला. आता गॅसची आंच मंद करुन घेऊन कांद्याबरोबर चिंच शिजवून घ्यावी. आता गॅस बंद करून थंड होऊ द्यावे.आणखी एक लहान पॅन घ्या. त्यात धणे, बडीशेप आणि जिरे घालून मंद आचेवर भाजून घ्यावी.  

काही सेकंदांनंतर त्यात अख्खी लाल मिरची घाला. आता गॅस बंद करून त्यात थोडे मेथीचे दाणे टाका. आता हे मसाले थंड झाल्यावर ग्राइंडरच्या मदतीने बारीक करून घ्या. आता एका भांड्यात मसाले काढा. 

यानंतर तुम्ही कांद्याचे मिश्रणही बारीक करा. कांद्याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात तयार केलेला कोरडा मसाला टाका आणि मिक्स करुन घ्या. तुमची कांद्याची चटणी रेडी आहे.