हिवाळ्यात करा 'हिवाळी स्पेशल डिंकाचे लाडू, आरोग्य राहिल उत्तम

चकचकीत स्वच्छ असा वाटाण्यासारखा बारीक डिंक अर्धा किलो, खारीक पाव किलो, आळीव पाव किलो

साहित्य

खसखस पाव किलो, सुकं खोबरे १ किलो, गूळ, साजूक तूप, बदामगर, वेलची पूड व जायफळ पूड

डिंक तुपात फुलवून घ्यावा, खसखस भाजून घ्यावी. आळीव थोड्या तुपात भाजावा. खारीक भाजून घ्यावी. सुकं खोबरं भाजावं. नंतर तळलेला डिंक खलबत्यात थोडासा कुटून घ्यावा.

कृती

खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्यावी.खारीकसुध्दा मिक्सरवर जराशी वाटून घ्यावी. (पीठ करू नये) हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यात बदामगर, वेलची व जायफळ पूड घालावी व मिश्रण हातानेच बारीक करावे.

लाडू करतेवेळी जेवढं मिश्रण असेल त्याच्यापेक्षा निम्मा गूळ घेऊन त्याचा गोळीबंद पाक करावा. पाक कोवळा करू नये.

लाडू करण्यासाठी पध्दत

साधारण हातात त्याची गोळी करता आली पाहिजे. नंतर पाक खाली उतरवून त्यात तयार केलेले सारण ओतावं आणि चांगलं ढवळावं. त्यानंतर भराभर लाडू करून घ्यावेत.

१५ दिवसात १० किलो वजन कमी करायचे उपाय